सिटीझन फोरम पवनी तर्फे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीची आरती

0
30
पवनीत 6 दिवसांपासून पाणी नाही,प्रशासनाच्या जागृतीसाठी आरती
पाईपलाईन फुटणे व 6 दिवसापेक्षा जास्त दिवस दुरुस्तीला लागणे यामागे मोठे आर्थिक षडयंत्राची भीती
पवनी : वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या व राष्ट्रीय इंदिरा सागर प्रकल्प गोसे धरण असलेल्या पवनी शहरात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते आहे.देशात तंत्रज्ञान प्रगत होत असतांना सर्व डिजिटल होत असतांना एका फुटलेल्या पाईप लाईन ला दुरुस्ती करायला 6 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. गेल्या 6 दिवसापासून पाणी पुरवठा पाईप लाईन फुटल्यामुळे अर्ध्या पवनीला पाणीपुरवठा बंद आहे.प्रगत राष्ट्रांकडे वाटचाल असताना एक पाईप दुरुस्तीला 6 दिवस लागत आहेत यावरून प्रशासनाची नागरिकांप्रती भावना दिसून येत आहे. पाणी ही माणसाची गरज असून ते व्यवस्थित पुरविण्याचे कर्तव्य नगर परिषदचे काम आहे.नागरिक टॅक्स भरत असतांना त्या मोबदल्यात त्यांना पुरेपूर व योग्य सोयी सुविधा पुरविणे आवश्यक असतांना संविधानिक हक्काची पायमल्ली नगर परिषद कडून होत आहे .नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.त्यात नगर परिषदचे मुख्याधिकारी कधीच पवनीमध्ये उपस्थिती राहत नाही नागरिकांचा रोष पाहता.सिटीझन फोरम पवनी तर्फे मुख्याधिकारी यांची सदैव रिकामी असलेल्या खुर्चीवर हार फुल चढवून नागरिकांच्या समस्यांची जाणीव व्हावी या साठी जागृत आरती करण्यात आली.त्यात मुख्यधिकारी पूर्ण वेळ असावा व पाण्याची समस्या दूर करावी ही मागणी करण्यात आली.पाईप लाईन अचानक कशी काय फुटली याची निष्पक्ष चौकशी व्हावी व दुरुस्ती साठी इतका वेळ का लागत आहे पर्यायी नागरिकांना 6 दिवसापासून होत असलेल्या त्रासाला दोषी कोण पाईपलाईन फुटणे व 6 दिवस व त्यापेक्षाही जास्त दिवस दुरुस्तीला लागणे यामागे मोठे आर्थिक षडयंत्र असल्याची भीती असून योग्य समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी सिटीझन फोरम तर्फे करण्यात आली त्यावेळेस वैभव बावनकर, संघर्ष अवसरे, योगेश बावनकर, निशांत नंदनवार, पारितोष वंजारी, निखिल शहारे, देवांग ईखार, निखिल धमदे, रितेश झगडू, अनिकेत सिंहगडे, सुमित शेंडे, धृव बोटकुले, विनायक देवीकर उपस्थित होते.
(गेल्या 6 दिवसापासून पवनी शहरातील शुक्रवारी वॉर्ड,गणेश वॉर्ड,नेताजी वॉर्ड,घोडेघाट वॉर्ड,सोमवारी इत्यादी भागात पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे आधी 3 दिवस लागणार अस माहिती देण्यात आली त्यामुळे नागरिकांनी 3 दिवसाचा साठा करून ठेवलेला होता आता 6 दिवस होऊन सुद्धा पाणीपुरवठा सुरू झालेला नाही नागरिकांना इकडे तिकडे पाण्यासाठी फिरावे लागते आहे.नागरिकाना व्यवस्थित मूलभूत गरजा पुरविणे हे प्रशासनाचे काम आहे नागरिक टॅक्स भरत असतांना फक्त मोबदल्यात त्रास मिळत असेल तर हे संविधानिक नाही याला नगरपरिषद व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत-संघर्ष अवसरे उपाध्यक्ष सिटीझन फोरम पवनी)