अनुकंपा उमेदवारांनी निवड यादीवरील आक्षेप 10 सप्टेंबर पर्यंत नोंदवावेत

0
44
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा उमेदवरांची प्रस्तावित निवड यादी प्रतिक्षा यादीनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केलेली आहे. या अनुकंपाधारकांची यादी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु नागपूरझेडपी डॉट कॉम या संकेतस्थळावर व जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तरी या बाबतीत ज्या उमेदवारांना आक्षेप आहेत त्यांनी ते 10 सप्टेंबरपूर्वी नोंदवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. या अनुकंपधारकाच्या प्रस्तावित निवड यादीवर काही आक्षेप असल्यास डीवायसीईओजी डॉट झेडपीएनजीपी ॲट जीमेल डॉट कॉम व सीईओझेडपीनागपूर ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा लेखी स्वरुपात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद नागपूर येथे 10 सप्टेंबर पर्यंत पाठविण्यात यावे. या तारखेनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही, असे कुंभेजकर यांनी कळविले आहे.