भगवान शहस्त्रबाहू जयंती कार्यक्रम बुधवारला

0
12

गोंदिया,दि. १७ : राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दीपक जायसवाल यांच्याद्वारे उद्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ४ वाजता फूलचुर येथील मॉ बम्लेश्वरी मंदिर परिसरात भगवान शहस्त्रबाहू जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कलचुरी समाजाचे सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी भगवान शहस्त्रबाहू व मॉ बम्लेश्वरीच्या पुजा अर्चनानंतर स्वजातीय बांधवांना दिवाळी मिलन व नगर पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांचा स्वागत करण्यात येणार आहे.