येरंडी- डोंगरगाव मार्गावरील नाल्यावर पूलाची मागणी

0
19

अर्जुनी-मोर,दि.11ः-जवळील एक किमी अंतरावर असलेल्या येरंडी ते डोंगरगाव या रस्त्यावर असलेल्या छोट्या नाल्यावरुन सतत पाणीवाहत असल्याने या ठिकाणी पूल तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सदर भागात ये जा करायला शेतकरी वर्गाला अडचण निर्माण होत असल्याने पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.पावसाळ्यात या पुलावर पाणी वाहून साचतो आहे. येरंडी गावाच्या शेतकरी नागरिकांना डोंगरगाव, कवठा या शेत शिवारात जाता येत नाही. तसेच या मार्गावरून शाळेत जाणारी मानव विकास योजना अंतर्गत चालणारी बस ही सुद्धा जाऊ शकत नाही.यापुर्वी झालेल्या कामात काम करणाऱ्या कंत्राटदारांने फक्त मोठे पाईप टाकून काम केले पण पुलाची उंची वाढविली नाही.
या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने आम्हाला जाणे येणे करता येत नाही. हे धोक्याचे आहे. यांची उंची वाढविली पाहिजे.
– दिलवर रामटेके,शेतकरी येरंडी
पाणी वाहते तर वावरात जाता येत नाही, पाण्याला धार असते, वावरात कसा जावा हे समजत नाही, बांधकाम विभागाने पुल बनवावे.- आर. एम. नंदागवळी,शेतकरी, डोंगरगाव शेतशिवार.