शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी

0
279

गोंदिया,दि.13 : खरीप हंगाम 2021-22 ची धान खरेदी प्रक्रिया सुरु होण्याअगोदरच
नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि शेतकरी नोंदणी 3 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत
करणे आवश्यक आहे असे एका पत्राद्वारे शासनाने जाहिर केले आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना
आधारभुत धार खरेदी केंद्रावर धान दयावयाचे आहे त्यांनी खरीप हंगाम 2021-22 धान/भात चा
सुधारित सातबारा (खरीप 2021-22), नमूना 8 अ, शेतकरी नोंदणी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स, बँक
पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे आपल्या जवळच्या संबंधीत धान खरेदी केंद्रावर नोंदणी
करण्याकरीता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जमा करावे. असे जिल्हा पणन अधिकारी,गोंदिया यांनी
कळविले आहे.