गाद रोगाने धानपिक उध्वस्त,नुकसानीचे पंचनामे करा

0
32

किशोर तरोणे यांची जिल्हाधिकारी आणि खासदार प्रफुल्ल पटेलांकडे मागणी*
अर्जुनी मोरगाव- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते.या हंगामात मान्सूनने जुलै आणि ऑगस्ट मध्ये दगा दिल्याने धान पिकांवर गाद रोगाने हल्ला चढवून पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.विविध संकटांमुळे आधीच धान उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.या हंगामात वातावरणातील बदलामुळे धान पिकावर गादी सह विविध कीड रोगांनी हल्ला चढवून पिकांची नासाडी केली.यामुळे उत्पादनात प्रचंड घट आहे.शेतकऱ्यांना लागवडीसाठी आलेला खर्च निघणे कठीण आहे.या हंगामातील उत्पादनात 80 टक्यांची घट येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी.विविध किड रोगांमुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे.सदर अहवाल नुकसानभरपाई साठी शासनास सादर करण्याची मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,याकरिता खासदार प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.