चांदोरी खुर्द येथे पोषण महिना कार्यक्रमांतर्गंत विविध स्पर्धांचे आयोजन

0
48

तिरोडा,दि.22ः- एकात्मीक महिला बालविकास प्रकल्प कार्यालय तिरोडाच्यावतीने राष्ट्रीय पोषण माहिना अंतर्गत चांदोरी खुर्द बिट इंदोरा प्रकल्प तिरोडा येथे 21 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये राष्ट्रीय पोषण महिना बद्दल महत्व सांगणे, पाककृती स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, कडधान्य पासुन कलाकृती स्पर्धा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम भव्य स्वरूपात घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच अलकेश मिश्रा तर कार्यक्रमाचे उद्घाटक बालविकास प्रकल्प अधिकारी विनोदकुमार चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून सामुदायिक आरोग्य अधिकारी श्रद्धांजली चौधरी, केंद्रप्रमुख श्री हिरापुरे श्री भगत व , अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पा रोहि मॅडम,श्रीमती वंदना दाते मॅडम,उपसरपंच ज्योती वैद्य,ग्राम सेवक भंडारी, जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका मुख्याध्यापिका इत्यादी होते.तसेच यावेळी इंदोरा बीट मधीय सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते. यावेळी गरोदर माता स्तनदा माता किशोरवयीन मुली व 0 ते 6 वयोगटातील बालके यांना मार्गदर्शन करण्यात आले.