ओबीसी मंत्रालयासाठी २ डिसेंबरला धरणे आंदोलन

0
10

चंद्रपूर- दि.  २४-येथील ओबीसी कृती समितीच्यावतीने रविवारला ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे या मागणीला घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ संघटक बबनराव फंड हे होते. बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली नाही, विद्याथ्र्यांना १०० टक्के स्कॉलरशीप मिळत नाही, विद्याथ्र्यांना जिल्हानिहाय वसतिगृह नाही, फ्री शिपचे परिपत्रक क्रिमीलेअरच्या मर्यादित निघाले नाही, शेतकèयांना १०० टक्के सुटीवर योजना नाही आहे. ओबीसी कर्मचाèयांचा पदोन्नती प्रश्न, सुशिक्षत बेरोजगारांना सरकारी योजनाचा प्रश्न या सर्व समस्यावर चर्चा करण्यात आली. संघटनेने आजपर्यंत अनेकदा आंदोलन केली परंतु सरकारने याकडे लक्ष घातले नाही. व सामाजिक न्याय विभागाने ओबीसी समाजाच्या कोणत्याही समस्या निकाली काढल्या नाही. म्हणून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून केंद्रात व राज्यात ओबीसी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला.
सदर बैठकीला ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर, प्राचार्य नामदेव चाफले, हिराचंद बोरकुटे, केशवराव जेणेकर, राहुल पवाडे, डी.के. आरीकर, प्रवीण चवरे, तुळशीराम भुरासे, पोतनवार, अविनाश पाल, सूर्यभान झाडे, दरेकर, अमोल ठाकरे, पारस पिपलकर, नरेश देवाळकर, राहुल बेले, कोटकर, प्रा. लेडे, वडस्कर आदी उपस्थित होते.