गोंदिया-आमगाव रेल्वे मार्गावर २७ पासून ब्लॉक

0
8

गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाअंतर्गत गोंदिया-गुदमा-आमगाव मार्गावरील ट्रॅकच्या कार्यासाठी २७ डिसेंबर २0१५ते १0जानेवारी २0१६ पर्यंत प्रत्येक शनिवार व रविवारी ३.१५ तासांचा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या प्रभावित होतील.
या ब्लॉकमुळे गोंदिया-दुर्ग (६८७४२) ही मेमो शनिवारी दि. १९ डिसेंबर, २६ डिसेंबर, २जानेवारी व ९ जानेवारी रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा २.३0 तास विलंबाने धावणार आहे. तसेच इतवारी-टाटा पॅसेजर (५८८१२) २0 डिसेंबर, २७ डिसेंबर, ३जानेवारी व १0 जानेवारी रोजी इतवारीवरून २तास विलंबाने धावणार आहे.