शैक्षणिक संमेलनातून विद्यार्थ्यांचा सामाजिक गुण उंचावतो – संजय पुराम

0
12

 

देवरी (ता 24)-  आई-वडील आणि शिक्षक हे मुलांचे जीवनमान उंचावत असतात. परंतु, विद्यार्थ्यामधील शैक्षणिक व सामाजिक गुण हा खऱ्या अर्थाने शैक्षणिक संमेलनाच्या माध्यमातून उंचावत असतो, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
ते देवरी तालुक्यातील डवकीच्या सिद्धार्थ हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. या स्नेह संमेलनाने उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शिवाजी पाठक, संस्थाध्यक्ष चैतराम मेश्राम, जि.प. गोंदियाचे समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प. सदस्या सरिता रहांगडाले. प्रा. महेंद्र मेश्राम, पं.स. सभापती देवकी मरई, हितेश डोंगरे, लक्ष्मण नाईक, सुरेश चन्ने, सुषमा येल्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. खोब्रागडे यांनी फीत लावून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. दरम्यान जि.प. उच्च माध्यमिक विद्यालय देवरीचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजी पाठक यांचा प्रा. महेंद्र मेश्राम यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्याथ्र्यांनी लिहिलेल्या ‘प्रतिबिंब‘ या हस्तपुस्तिकेचे डॉ. खोब्रागडे यांनी अनावरण केले.
याप्रसंगी बोलताना सत्कारमूर्ती शिवाजी पाठक यांनी आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा देत उपस्थित विद्याथ्र्यांना गुरुमंत्र दिला. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी आपल्या भाषणातून थोर नेत्यांच्या निवडक कथा सांगून विद्याथ्र्यांनी प्रोत्साहित केले.
या स्नेह संमेलन सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक जे. टी. ठवरे, वाय. बी. बोरकर, व्ही. टी पटले, एन जे निखारे आदी शिक्षकांनी सहकार्य केले.
संचालन भूपेश कुलसुंगे आणि सुषमा जवंजाळ यांनी केले. उपस्थितांचे आभार जे टी ठवरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.