भाजपने दिल्या जश्ने ईद मिलाद्दुनबीच्या शुभेच्छा

0
13

– कालेखाँ चौकावर जुलूसचे स्वागत
गोंदिया, दि.२४  : मुस्लीम बांधवांच्या पवित्र सन जश्ने ईद मिलाद्दुनबी निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज २४ डिसेंबर रोजी शहरातून निघालेल्या जुलूसचे कालेखाँ चौकावरील नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय,संजय कुलकर्णी,  अहमद मनियार,  जयंत शुक्ला, शहर महामंत्री अमित झा, सुनिल केलनका, नगरसेवक घनश्याम पानतवने, शिव शर्मा, बंटी पंचबुद्धे, महेंद्र उके, प्रदिपqसह ठाकूर, ऋिषीकांत साहू, हरिश चौरसिया, अभय अग्रवाल, मुन्ना अवस्थी, सुभाष मुंदडा, छोटू रामटेककर, सुरेश चंदनकर, जहीर खान, शैलेश ढाले, अतुल फेंडारकर, दुर्गेश भिवगडे यांनी मुस्लीम बांधवांचे पुष्पहाराने सत्कार करून जुलूस मध्ये सहभागी बांधवांना आईस्क्रीमचे वितरण केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.