किर्तींच्या आरोपानंतर सक्रिय झाला अडवाणी गट

0
7
नवी दिल्ली – खासदार किर्ती आझाद यांच्या निलंबनानंतर भारतीय जनता पक्षातील अडवाणी गट सक्रिय झाला आहे. गुरुवारी पक्षाच्या काही नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात मार्गदर्शक मंडळातील काही नेत्यांचा समावेश होता. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवर डीडीसीए घोटाळ्याचा आरोप आहे, याप्रकरणी चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्याच्या बाजूने मत ज्येष्ठ नेत्यांनी मत नोंदवले.
मुरली मनोहर जोशींच्या घरी झालेल्या बैठकीला लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा आणि शांता कुमार यासारखे ज्येष्ठ भाजप नेते उपस्थित होते.पक्षातून निलंबित करण्यात आलेले किर्ती आझाद म्हणाले, मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे आणि मार्गदर्शक मंडळासोबतही माझ्या निलंबनावर चर्चा करणार आहे.