केंद्रिय गृहराज्यमंत्री सिंह येणार राजाभोज जयंतीला

0
10

नागपूर,दि.25- नागपूर येथील भोयर पवार समाज संघटन,पवार क्षत्रिय समाज संघटनेच्यावतीने नागपूरातील सर्व पवार,भोयर -पवार व पोवार समाजसंघटनाना एकत्रित करुन येत्या 14 फेबुवारीला येथील रेशीमबाग मैदानावर भव्य स्वरुपात समाजाचे प्रेरणास्त्रोत दैवत चक्रवर्ती राजाभोज यांची जंयती साजरी करण्यात येणार आहे.या भव्यदिव्य राजाभोज जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांना निमंत्रित करण्यात आले आहे.भंडारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे ,हरियाणा येथील समाजाचे वरिष्ट नेते वेदपालसिंह परमार तसेच राजाभोज जंयती उत्सव समितीचे प्रमुख मोतीलाल चौधरी,यशवंत (गुड्डू)रहागंडाले यांच्यासह समाजातील मान्यवरांनी नवी दिल्ली येथे जाऊन सिंह यांची भेट घेतली.सिंह यांनी समारंभाला येण्याचे आमंत्रणही स्विकारले आहे.सोबतच बडनेराचे आमदार रवी राणा,तिरोडयाचे आमदार विजय रहागंडाले यांना सुध्दा या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले आहे.