शिक्षण, आरोग्य व सौंदर्यीकरण या त्रिसूत्रीवर भंडारा शहराचा विकास साधणार – आ. नरेंद्र भोंडेकर…

0
21
भंडारा: चुकीच्या लोकांच्या हातात सत्तासूत्रे राहील्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असूनही भंडारा शहर विकासापासून वंचित राहिले. भंडारा विधानसभा क्षेत्राचा आमदार व शहराचा नागरिक या नात्याने शिक्षण, आरोगय व शहराचे सौंदर्यीकरण या त्रिसूत्रीवर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. भंडारा शहर शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 22 एप्रिल रोजी आनंद मंगल कार्यालयात हा मेळावा घेण्यात आला. भंडारा शहरातील न.प.च्या मालकीच्या 11 शाळा असून त्यापैकी केवळ 4 शाळा सुरू आहेत. नं.प. च्या शाळा बंद असल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण घेणे परवडत नाही. अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, ही अडचण लक्षात घेवून व काळाचे बदलते स्वरूप लक्षात घेवून न.प. च्या डिजीटल शाळा सुरु करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. भगतसिग शाळा टाकळी, बजाज शाळा यांना प्रत्येकी 2 कोटी रूपये तर गांधी शाळेला 5 कोटी रूपयांचे नियोजन करण्यात आले असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगीतले. शहरातील नागरिकांना आरोग्याच्या अद्यावत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्षभरात महिला रूग्णालय सेवेत रूजू होत आहे. अद्यावत रूग्णवाहीका देण्यात येत आहेत. बौध्द विहारांमध्ये ई-लायब्ररीचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच भूमीगत गटारे प्रकल्पाचे व ईतरही सौंदर्यीकरणाच्या किमान 200 कोटींच्या कामाचे भूमिपूजन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
माजी न.प. उपाध्यक्ष दिनेश भूरे, माजी नगर सेवक नितीन धकाते व नवनियुक्त शहर प्रमुख मनोज साकोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे यांचीही यावेळी भाषणे झालीत. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सविता तूरकर, माजी संघटिका आशा गायधने, विद्यार्थी सेना जिल्हा अधिकारी जितेश ईखार, कामगार सेना संघटक श्रीकांत पंचबुध्दे, माजी नगर सेवक नितीन धकाते, माजी न.प. उपाध्यक्ष दिनेश भूरे, जाकी रावलानी, आदी उपस्थित होते. संचालन विलास साकोरे यांनी तर आभार प्रदर्शन शहर प्रमुख मनोज साकोरे यांनी केले.