इलेक्ट्रोपॅथी ही कमी खर्चात लाभ देणारी गरीबांची पॅथी

0
11

तिरोडा  दि.१५: इलेक्ट्रोपॅथी ही गरिबांची पॅथी असून कमी पैशात अधिक गुणकारी आहे.गावात डॉक्टर नसते तर प्रत्येक दिवसाला दोन-चार मृत्यू प्रकरण आढळले असते, असे मत तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आ. दिलीप बंसोड यांनीव्यक्त केले.
मेडिकल असोसिएशनद्वारे इलेक्ट्रो-होमोओपॅथीबद्दल जागृती निर्माण व्हावी, शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, इलेक्ट्रोपेथी ही गरिबांची पॅथी असल्याने जनतेमध्ये प्रसार व्हावा याकरिता तिरोडा समितीच्या वतीने इलेक्ट्रोहोमीओपॅथीचे जनक कॉन्सीजर मेटी यांच्या २0७ व्या जयंतीनिमित्त तिरोडा येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.के.जी. तुरकर होते. अतिथी म्हणून डॉ.सी.एच. भगत, डॉ.ओ.टी. भैरम, डॉ.जी.एस. बिसेन, डॉ. विनोद भगत, डॉ. रूपेश बांते, डॉ. रुपेश बांते, डॉ. शिशुपाल रहांगडाले, डॉ. फाल्गुन कटरे, डॉ. सिध्दार्थ खोब्रागडे, नवेझरीचे डॉ. चान्सी, डॉ.एस.बी.येवले आणि डॉ.के.बी. राणे उपस्थित होते.
यावेळी इलेक्ट्रोपॅथीचे जनक मेटी यांच्या कार्याबद्दल आणि आविष्काराबद्दल तसेच अनेक संघर्ष, धरणे आंदोलन केल्यावरसुध्दा नेते व राजकारणी लोकांच्या असहयोगाबद्दल सी.एस. भगत, डॉ.पी.एन. भगत, डॉ.एस.बी. येवले, डॉ.के.जी. तुरकर, बालाघाटचे डॉ. दीक्षित, डॉ. मुक्ता अग्रवाल व के.बी. राणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला २00 च्या वर डॉक्टर उपस्थित होते. संचालन डॉ.गणेश बिसेन व आभार ओमप्रकाश भैरम यांनी मानले.