हरविलेले दीड लाखाचे दागिने परत – बारा वर्षीय निकुंज आगळेचा प्रामाणिकपणा

0
44

गोंदिया,- एका खासगी शाळेच्या वाहनचालकाच्या मुलाने हरविलेले दीड लाख रुपयांचे दागिने 29 एप्रिल रोजी संबंधितांना परत करुन 12 वर्षीय मुलाने समाजात प्रामाणिकपणा अजुनही जीवंत असल्याचे दाखवून दिले. निकुंज महेंद्र आगळे असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीनगर येथील गीता तिडके व त्यांची नणंद कोमल तिडके या 29 एप्रिल रोजी दीड लाखाचे दागिने गहाण ठेवण्यासाठी फायनान्स कंपनीच्या कार्यालयाकडे दुचाकीने जात होते.ते दरम्यान, Jwellery दागिने असलेली प्लॉस्टिकची बॅग दुचाकीवरुन खाली पडली. ही बाब तेथून जाणार्‍या निकुंजच्या लक्षात आल्याने त्याने बॅग उचलून घर गाठले व आईला घडलेली हकीकत
सांगितले. दरम्यान तिडके या फायनान्स कंपनीत गेल्यावर दागिनेची बॅग हरविल्याचे लक्षात आले.याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी शोधकार्य सुरु केले.तर निकुंजचे वडील शाळेतून घरी आल्यावर त्यांनाही निकुंजने घडलेला प्रकार सांगितला.महेंद्र आगळे यांनी बॅगमध्ये मिळालेल्या आधार कार्डच्या आधारे तिडके यांचे घर शोधून त्यांना दागिन्याची बॅग परत केली. दरम्यान, निकुंज व त्यांच्या आईवडीलांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, ठाणेदार महेश बंसोड यांनी त्यांचा शाल,
श्रीफळ व पुष्पुगुच्छ देऊन सत्कार केला.तर तिडके कुटूंबीयांनी आभार व्यक्त केले.