जुन्या उड्डाण पूलावरील वाहतूक 2 मे पासूून पूर्णत बंदःजिल्हाधिकारी यांचे आदेश

0
229

गोंदिया,दि.03 : शहरातील गोंदिया -बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाण पूल जीर्ण झाल्याने वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हा पूल वाहतुकी साठी पूर्णपणे बंद करुन पूल त्वरीत पाडण्यासंबधी जुर्ले 2018 मध्ये रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानंतर 31 जुर्लेपासून जडवाहतूक बंद करुन तो पूल  लहान वाहनाच्या वाहतुकीकरीता सुरु ठेवण्यात आलेला होता.वास्तविक या 4 वर्षात पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल तयार व्हायला हवे होते.मात्र जिल्हा प्रशासन व स्थानिक आमदार खासदांच्या दुर्लक्षामुळे ते होऊ शकले नाही.आता जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आत्ता 25 एप्रिल 2022 रोजी झालेल्या सभेनंतर  2 मे 2022 पासून हा पूल पुर्णतःवाहतूकीकरीता बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.त्यामुळे या पूलावरून शहराच्या दुसरा भागाला जोडणारा मार्ग बंद होणार असल्याने मोठ्या पूलावर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.                         गेल्या दोन वर्षापासून सदर पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे,मात्र अद्यापही पूल पाडू शकले नाही.पूल पाडण्यासाठी बांधकाम विभागाची निविदा मंजूर झाली परंतू कत्रांटदाराने अद्याप काम सुरु केलेले नाही.जोपर्यंत हा पूल पाडला जात नाही,तोपर्यंत नविन पूलाच्या बांधकामालाही सुरवात होणार नाही.त्यातच पूलाखाली राहणार्या कुटूबियांनी आधी आमचे पूनर्वसन करा नंतरच पूल पाडा अशी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रशासन गोंधळले गेले आहे.
गोंदिया बालाघाट मार्गावर १९५२ मध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आला.या पुलामुळे रेल्वे ट्रॅकमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत झाली होती.तेव्हा पासून आत्ता पर्यंत म्हणजे जवळ 70 वर्षे याच उड्डाणपुला वरुन वाहतूक सुरु होती.याच उड्डाणपुला वरुन तिरोडा,बालाघाट मार्गे येणारी लहान मोठी सर्वच वाहने येतात.पलिकडच्या भागात जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो.दिवसभरात या पुलावरुन दोन ते तीन हजार वाहने धावतात.तर रेल्वे ट्रॅकच्या वरून जाणाऱ्या उड्डाण पुलाला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. हा भाग रेल्वे विभागाच्या क्षेत्रात असल्याने रेल्वेने या उड्डाण पुलाचे स्ट्रक्चर आॅडि ट केले. त्यात ट्रॅकवरुन गेलेला उड्डाण पूल वाहतूक करण्या योग्य नसून तो केव्हाही कोसळू शकतो.ही बाब आडिटनंतर पुढे आली.त्यामुळे रेल्वे विभागाने २१ जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देवून जुन्या उड्डाणपुलावरुन सुरु असलेली वाहतूक त्वरीत बंद करावी.या दरम्यान कुठली अनुचित घटना घडल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही असे म्हटले होते.सोबतच संभाव्य धोका लक्षात घेता हा उड्डाण पूल त्वरीत पाडण्यात यावा असे पत्रात म्हटले होते,त्यानंतरही या पूलावरून आजपर्यंत वाहतूक अद्यापही सुरूच आहे.जिल्हाधिकारी यांनी 2 मे पासून पूर्णतःवाहतूकीसाठी पूल बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतरही आज(दि.3 मे)रोजी यापूलावरून वाहतूक सुरु होती.

विशेष म्हणजे 2018 मध्येच सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांच्या चमूने  जुन्या आणि नवीन उड्डाण पुलाची पाहणी करुन अहवाल सादर केला होता.त्यात हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून त्यावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे २३ जुर्ले 2018 रोजी सोपविला होता.
रेल्वेट्रॅक परिसरातील पुलाला पडले भगदाड
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाण पुलाच्या बांधकामाला आता 70 वर्षे पूर्ण झाली आहे.त्यामुळे हा पूल जीर्ण झाला आहे.या पुलाच्या रेल्वे ट्रॅक परिसरातील भागाला मोठे मोठे भगदाड पडले आहे. पुलाच्या खालची बाजू सुध्दा जीर्ण झाल्याने केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .

२०१४ मध्येच रेल्वेने दिला होता इशारा
गोंदिया -बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल वाहतुकी साठी धोकादायक असून या उड्डाण पुलावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा इशारा रेल्वे विभागाने २०१४ मध्ये जिल्हा प्रशासनाला पत्र देवून दिला होता. मात्र तत्कालीन अधिकाºयांनी गांर्भियाने दखल घेतली नव्हती.मुंबई येथे घडलेल्या घटनेनंतर रेल्वे विभाग कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाही.त्यामुळेच पुन्हा 2018 मध्ये तातडीने पत्र देवून जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यास सांगितले,त्यास आज 4 वर्षाचा काळ लोटला असून जिल्हाप्रशासन फक्त उड्डाण पूलावरील वाहतूक बंद करण्याचे पत्र काढून काही दिवसांनी पून्हा लोकप्रतिनिधींच्या दबावात वाहतूक सुरु करण्याची परवानगीच देत असल्याचे बघावयास मिळाले आहे.