भजेपारात अवतरली तुकडोजींची ‘मोझरी’

0
10
ग्रामगीतेचा जागर आणि पालखीयात्रेचे विशेष आयोजन
सालेकसा : तालुक्यातील भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडाळाचे वतीने ११ ते १७ जानेवारी दरम्यान तुकडोजी महाराज ध्यान मंदिराच्या प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सव            साजरा करण्यात आला.  मोझरी येथील ग्रामगिताचार्य सेलेटकर महाराजांच्या उपस्थितीत सातही दिवस ग्रामगीतेचा जागर करून विविधांगी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान गावभ्रमंती करणाNया ग्रामगीतेच्या पालखीयात्रेने भजेपार नगरी दुमदुमली. दरम्यान भजेपारात मोझरी अवतरल्याचा भास झाला.
मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव भजेपार येथे मागील १० ते १५ वर्षापासून नियमीत साजरा करण्यात येतो. यंदा  १२ वा पुण्यतिथी महोत्सव ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांनी                साजरा करण्यात आला. ११           जानेवारीला उद्घाटन प्रसंगी ग्रंथ दिंडी तथा तुकडोंजीची पालकीयात्रा काढण्यात आली. यावेळी गुरुदेव उपासकांसह गावातील तरूणांनी भगव्या टोप्या परिधान करून भजनपार्टीत सहभाग घेतल्याने पालखीयात्रेची शोभा अधिकच वाढली.               राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वावर पर्यावरण मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
 यावेळी  आमगावचे                   वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी. अवगाल उपस्थित होते. १२           जानेवारीला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर आणि यशस्वी विद्याथ्र्यांचा सत्कार या कार्यक्रमाला गावातील तथा परिसरातील शेकडो महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना स्पर्धा परीक्षे संदर्भात सेवानिवृत्त कृषी अधिक्षक मनोहर चंद्रीकापुरे, लखनसिंह कटरे, सेवानिवृत्त प्राचार्या मंजूताई चंद्रिकापुरे, प्राचार्या कठाणे यांनी मार्गदर्शन केले. १३ जानेवारीला प्रसिध्द हृदय रोगतज्ञ डॉ. एल.एल.बजाज आणि त्यांची चम्मू यांच्या उपस्थिीत भव्य आरोग्य शिबीर व मोफत शिबीरात ३५० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी वितरण करण्यात आले. १४      जानेवारीला गुरूवुंâज मोझरी आश्रम येथील ग्रामगिताचार्य शेलोटकर महाराजांचे ग्रामगिता प्रवचन तर १५ जानेवारीला भव्य महिला मेळावा हळदी वुंâवूâ कार्यक्रम जि.प. अध्यक्षा उषा मेंढे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. १६ जानेवारीला अ‍ॅड.बागडे यांच्या उपस्थितीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर झाले. १७             जानेवारीला सकाळी ८.३०                               वाजता राष्ट्रसंताची पालखी शोभा यात्रा, गावदिंडी जनजागृती रॅली काढण्यात आली. समारोपाच्यावेळी एका जोडप्याचे नि:शुल्क विवाह मंडळाच्या वतीने लावण्यात आले.
 यावेळी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार यांसह अनेक नेते उपस्थित होते. ग्रामगिताचार्य रायजीप्रभु शेलोटकर यांचे हस्ते गोपालकाला आणि महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपुर्ण भजेपारवासीयांनी एकोप्याने प्रयत्न केले.