व्यसनमुक्ती दिंडीला जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्यांची हजेरी

0
8

सामाजिक न्यायमंत्र्याने दिली व्यसनमुक्तीची शपथ

गोंदिया,दि.२२ : देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आज (दि.२२)जिल्ह्यातील सुमारे ५० शाळांच्या विद्याथ्र्यांचा सहभाग असलेली व्यसनमुक्ती दिंडी शहरात काढण्यात आली.या रॅलीची सुरवात इंदिरा गांधी स्टेडियम येथून करण्यात आली.तिथे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी विद्याथ्र्यांसह उपस्थित जनता व अधिकारी यांना व्यसनमुक्त महाराष्ट्राची शपथ दिली.
स्टेडियम येथून निघालेली qदडी नेहरू चौक,गोरेलाल चौक,गांधी प्रतिमा मार्ग सकर्स मैदानावर पोचली.तिथेच qदडाचा समारोप करण्यात आला.qदडीमध्ये भारतीय राज्यघटनेसह पुस्तके असलेली ग्रंथqदडीही काढण्यात आली.ग्रंथदीडीची सुरवात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले,जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,समेलनांध्यक्ष मुक्ताताई पुणतांबेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,अभिनेंत्री निशा परुळेकर,शारदा बडोले,समाजकल्याणविभागाचे उपायुक्त माधव झोड,सुनील जाधव,जिल्हा परिषदेसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. qदडीमध्ये प्रोगेसिव्ह हायस्कूल,नूतन हायस्कूल,बहेकार व्यसनमुक्ती केंद्र,जिल्हा परिषद हायस्कूल एकोडी,जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव,जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी,जानकीदेवी चौरागडे हायस्कूल गोंदिया,मनोहर म्युन्सीपल हायस्कूल,चुटीया हायस्कूल,सरस्वती हायस्कूल,मनोहरभाई पटेल सैनिक विद्यालय,राजीव गांधी समाजकार्य महाविद्याल,प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह स्वयसेवी संस्था आणि इतर शाळा सहभागी झाल्या होत्या.