सुरतोली येथे प्रजासत्ताक दिन साजरा

0
17

देवरी- तालुक्यातील सुरतोली येथे 67 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी  सुरतोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शाऴा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमसिंह परिहार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीच्या उपसभापती संगीता भेलावे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य दीपससिंह पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप परिहार, सरपंच भावना राऊत, पंचायत समिती सदस्य सुनंदा बहेकार, उपसरपंच दिनेश भुते, नरेंद्र बळगे, दमयंता अगडे, अनिता कोसरे, चंदा ढोमणे, जीजा मरस्कोल्हे, बासूदेव बोरकर, पुरणलाल मटाले, सीताराम सराटे, पोलिस पाटील सावंत परिहार, जगदीशसिंह पवार, युंगेश पवार, डिलनसिहं परिहार, गणेश भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने शाल-श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जि.प. सदस्य पवार यांनी  शाळेला डिजीटल शाळा बनविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. दरम्यान, कौशल्या पवार यांनी शाळेला दोन सिलिंग पंखे, हंसराज टेटे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरीता कापड तर मनोहर चव्हाण यांनी गणवेस सिलाईसाठी आर्थिक सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन डी. ए पंधरे यांनी केले. उपस्थितांचे आभार एल यु तावाडे यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.