रविवारला पुणे येथे तेली समाजाचा परिचय मेळावा

0
23

चंद्रपूर,दि.11-राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विखुरलेल्या तेली समाज बांधवातील लग्नायोग्य झालेल्या युवक युवतींकरीता पुणे जिल्हा ग्रामीण तेली समाज संघटनेच्यावतीने येत्या रविवारला 14 फेबुवारीला वधु वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन तेली समाज नागपूर विभागीय अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई बगुलकर यांनी केले आहे. सदर मेळावा पुणे येथील  साईलिला मंगल कार्यालय आळेफाटा नाशिक रोड ,हेमंत हॉटेल समोर सकाळी ९ ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यत आयोजित करण्यात आले आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  ईमेल hemantwavhali@gnall .com  संपर्क करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी चंद्रकांत व्याहाळ,सत्यवानशेठ कहाणे,सतीशसेठ दळवी,ज्ञानेश्वर दुगूडे आणि कल्पनाताई बगुलकर चंद्रपूर यांच्याशी 9096780491 संपर्क करण्याचे आवाहन तेली महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.