भटक्या विमुक्त समाजाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर १४ रोजी

0
9
गोंदिया दि. ११: देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर शासनाद्वारे मागासलेल्या समाजाला राजकीय शैक्षणिक सुरक्षा देऊन त्यांच्या विकासात भरपूर मदत करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात आले. परंतु देशातील जवळपास १५ टक्के जनता जी भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गात ते आजही अत्यंत दैयनिय परिस्थिती गावकूसा बाहेर रेल्वे पुलाखाली शेती शिवारात भटकंती करून जीवन जगत आहे. त्यांची संख्या                     महाराष्ट्रात १.२७ कोटी चा जवळ-पास  असून त्यांच्या सामाजिक न्याय हक्काकरिता संघर्षवाहिनी भटक्या विमुक्त संघर्ष परिषद मार्फत नागपूर, मुंबई आदी विधानसभा सत्रात वारंवार मोर्चे, निर्देशने, निवेदन देण्यात आली. परंतू सरकारने त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन अतिरिक्त काहीच दिले नाही. राष्ट्रीय स्तरावर कार्यकत्र्यांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून सन १९९८ पासून २०१५ पर्यंत विविध स्तरावर कार्यकत्र्यांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून सन १९९८ पासून २०१५ पर्यंत विविध सव्र्हेक्षण समित्या वर समित्या, आयोगावर आयोग गठित करून त्यांची शिफारसी सादर केल्या. परंतु अजुनही त्या शासन दरबारी कागदोपत्रीत धुळ खात आहेत. संघर्ष वाहिनीद्वारे गोंदिया, भंडारा, चे संपूर्ण १५ तहसील कार्यालयावर समाजाची प्रलंबीत मागण्यांचे मंजुरी करीता २९ फेबु्रवारी रोजी होणाNया मोर्चाचे आयोजनाची पुर्वी तयारी म्हणून साकोली येथे १४ फेबु्रवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण खुले स्वरुपाचे होणार असून समाजातील जागरुक नागरिकांने स्वयं उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा संगठक परेश दुरुगवार तर्फे करण्यात येत आहे.