शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स २३ हजारच्या खाली

0
13
नवी दिल्ली, दि. ११ – उतरणीला लागलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ८०० अंकांनी कोसळून २३ हजारांच्या खाली बंद झाला. या घसरणीचा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही फटका बसला. 
निफ्टीनेही २३९ अंकांनी घसरुन सात हजारच्या खाली ६९७६ अंकांवर बंद झाला. मे २०१४ नंतर झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. बांधकाम, ऊर्जा, बँक, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.