अखेर रिंगरोडमध्ये येणाèया त्या घरांवर चालला बुलडोझर

0
13

 
१२ कुटुबांचा संसार उघड्यावर
बांधकाम,पोलीस आणि महसूल विभागाची सयुंक्त कारवाई
तगड्या बंदोबस्तात जेसीबीने केली घरे जमीनदोस्त

गोंदिया :- आम्हाला मोबदला मिळालाच नाही. आणि जमीन आमच्या ताब्यात असताना मोबदल्याची उचल कुणी केलीच कशी असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळत नाही.तोपर्यंत घर रिकामे करणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु त्यांच्या या भूमिकेचा काहीच उपयोग झाला नाही,अखेर घरदारातील सर्व साहित्य रस्त्यावर येऊन त्यांचा संसारच उघड्यावर आला आहे.तर काहींनी ही कारवाई बघून आपल्या घरातील साहित्य स्वत:च बाहेर काढायला सुरवात केली.

सकाळी १० वाजेच्या सुमारास राधाकृष्ण चौकात बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस ताफ्यासह पोचले तेव्हा काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.छोटा गोंदिया भागातून जाणाèया रिंग रोडमध्ये नगरपालिके अंतर्गत राधाकृष्ण चौकातील मोलमजुरी करणाèया आदिवासी, मागासवर्गीयांची घरे आली आहेत.त्या घरांना हटविण्यासंदर्भात बांधकाम विभागाच्यावतीने नोटीस देऊनही घरे रिकामी न केल्याने अखेर आज गुरुवारला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाने सयुंक्त कारवाई करीत बुलडोझर चालवून त्या घरांना जमीनदोस्त केले.

रिंगरोडचा गेल्या दीड दोन वर्षापासून रखडलेला प्रश्न निकाली काढला.या भागात ११-१२ कुटुबांनी रस्त्याच्या मधोमध तसेच काहींनी लागून घरांचे बांधकाम केले होते.त्यांना आपली घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.सदरचा रस्ता हा मरारटोली वळणरस्त्यापासून छोटा गोंदिया -जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारून पोलीस मुख्यालयाजवळ कारंजा येथे ७.२५ किलोमीटरचा आहे.

हा रस्ता सिवनी-बालाघाट-गोंदिया-कोहमारा या नव्या राष्ट्रीय महामार्गात चौपदरीकरण करण्यात येणार आहे.यासाठी बांधकाम विभागाने आधीच चौपदरीकरणाच्या दृष्टीने ४५ मीटरजागेचे पैसे संबधित जागेच्या मूळमालकांना आधीच दिल्याची माहिती उपविभागीय अभियंता रमेश बाजपेयी आणि पोलीस निरीक्षक शुक्ला यांनी दिली.
मागील १५ ते २० वर्षापासून राधाकृष्ण चौक छोटा गोंदिया येथे रमेश चंदुलाल शहारे, बबलू मलेवार,बाबुलाल पैकू कटरे,सुरेश मंसाराम कावरे,लीलावती राजेन्द्र नागरिकर,घनश्याम श्रीपत भेलावे, रूपचंद गोमा बोंदरे, चंद्रशेखर डोमाजी हरिणखेडे, बकाराम qचधूजी सोनवाने,बुधराम राघोजी भगत या लोकांनी भरत जियालाल वाघमारे,सुरेश जियालाल वाघमारे यांची गट क्रमांक ३४१/१ ब,२ ३४३/१ ग,३४२/१,३४३/२/१ घ पैकी काही जागा घेऊन घरे बांधली.या लोकांकडे जमिनीचे रजिस्ट्री केल्याची कागदपत्रे ही उपलब्ध आहेत.आजपर्यंत या सर्व लोकांना तुमचे घर qकवा जागा संपादित करण्यात येत आहे. अशी कुठलीही नोटीस सुद्धा देण्यात आलेली नाही. मात्र जानेवारी महिन्यात तुमचे घर रिंग रोड मध्ये येत असून जागेवर तुम्ही अतिक्रमण केलेले आहे. सदर जागा रिंग रोडसाठी संपादित करण्यात आली असून तुम्ही केलेले अतिक्रमण काढा अन्यथा तुमचे अतिक्रमण पाडण्यात येईल व त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल करण्यात येईल अशी नोटीस दिली.

त्यानुसार आज गुरुवारला ही कारवाई करण्यात आली.सध्याच्या घडीला अर्धा किलोमीटरचा रस्ता या घरामुळे अर्धवट राहिलेला होता.उर्वरित ७ किलोमीटरचा रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे.त्यातच चौपदरीकरणाची घोषणा होऊन त्यासंबधीची प्रकिया सुरू झाल्याने या रस्त्याचे रखडलेले काम सध्याच्या कंत्राटदाराला पूर्ण करावयाचे होते.एकीकडे अन्याग्रस्त आपली घरे १०-१२ वर्षापासून असल्याचे सांगत असले तरी ती जागा त्यांनी ज्या मूळ मालकाकडून खरेदी केली त्या मूळ मालकाला आधीच अर्वाड स्वरूपात जमिनीच्या मोबदल्याची रक्कम देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी बेरार टाईम्सला दिली.त्या जागेच्या संपादनासाठी ४ लाख ८२ हजार १८ रुपये मोबदला देण्यातही आलेला आहे.