प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा सुरु करणार – मुख्यमंत्री

0
11

संशोधन पुनरुत्थानावर तीन दिवस आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा
117 शोध निबंध सादर होणार

नागपूर दि. ११राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. व्हीएनआयटीच्या सभागृहात तीन दिवस चालणाऱ्या संशोधन पुनरुत्थान या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

समारंभास नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे, व्हीएनआयटीचे संचालक विश्राम जामदार उपस्थित होते. भारतीय शिक्षण मंडळातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेत जी चर्चा होईल त्या चर्चेतील ज्ञानाचा उपयोग निश्चितपणे दिशा देणारा असेल. या संशोधनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विस्तारासाठी निश्चित एक धोरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही ही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रास्ताविक खासदार अजय संचेती यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. या समारंभास आमदार नागो गाणार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, बनवारीलाल पुरोहित व इतर शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.