जिल्हा परिषदेत श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज

0
19

गोंदिया- शासनाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाचा दृष्यमान स्वच्छतेवर भर आहे. त्यानिमीत्त तथा मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून उद्या 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात श्रमदानातून संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता ही सेवा अभियान दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने उद्या 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यायांमध्ये स्वच्छता फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत आवारात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमदानातून संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले आहे.