नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील ‘ते’वाघ आकर्षणाचे केंद्र

0
36

गोंदिया,दि.19ः गोंदिया-भंडारा Navegaon-Nagzira Sanctuary जिल्ह्याचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्य पर्यटकांसाठी नंदनवन ठरत आहे. सध्या हे अभयारण्य पर्यटनासाठी बंद आहे. पुढील महिन्यात पर्यटनासाठी हा प्रकल्प खुला करण्यात येणार आहे. या अभयारण्यातील 8 वाघ पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत.नवेगाव-नागझिरा व्याघ्र Navegaon-Nagzira Sanctuary प्रकल्पाला डिसेंबर 2013 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, भारताचा 46 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले. भारतातील जवळ जवळ एक षष्ठांश व्याघ्र संख्या याच प्रकल्पात अस्तित्वात आहे.
एनएनटीआरमध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य,
न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे.याचे क्षेत्रफळ 133.88 चौ.किमी आहे. पैकी 17.6 हेक्टर नागझिरा अभयारण्याला देण्यात आले आहे.तर 251.46 हेक्टर जमीन कोका अभयारण्यास देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्र अतिसंरक्षित व्याघ्र क्षेत्र म्हणूनणू संरक्षित केले आहे. या व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्रात मोठ्या संख्येने वन्यजीव आहे. नवेगाव परिसराला पक्षी अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. वाघ, बिबट, अस्वल, सांबर, चितळ, रानकुत्रे यांसारखे मोठे सस्तन प्राणी येथे आहेत. वनक्षेत्रात 209 प्रकारचे पक्षी, 9
प्रकारचे सरीसृप, 26 प्रकारचे सस्तन प्राणी ज्यात दुर्मिळ लांडगे, चांदी अस्वल, तडस यांचा समावेश आहे. या व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. व्याघ्र प्रकल्पातील सिमेत विचरण करणारे 8 वाघ व्याघ्रप्रकल्पाची शान आहेत. या वाघांमुळे येथे येणारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक नागझिरा अभयारण्यात येतात. परंतु हळूहळू वन्यजीवांचे महत्त्व पाहून सरकारने अभयारण्याच्या परिसरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.