एका खासगी रुग्णालयात रिसेप्श्नीस्टचे रात्रीला अश्लील चाळे

0
8

गोंदिया,दि.२४-शहरातील एका नामाqकत खासगी रुग्णालयामध्ये १९ फेबुवारीच्या रात्रीला सुमारे २ वाजेच्या सुमारास त्या रुग्णालयातील रिसेप्श्नीस्ट आणि एका नर्सला त्याच रुग्णालयातील चौकीदारांने रात्रीच्या आपल्या फेरीदरम्यान पकडल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे त्या रुग्णालयाचा चौकीदार हे रात्रीला फेरी मारत असताना दुसèया माळ्यावरील एका खोलीतून आवाज येऊ लागला.रात्री दोनच्या सुमारास कशाचा आवाज येतोय म्हणून तो गेला असता त्याठिकाणी रिसेप्श्नीस्ट युवक आणि त्याच रुग्णालयातील नर्स त्याला विचित्र परिस्थितीत आढळून आले असता तो जोराने ओरडला.आणि आजूबाजूच्या वार्डात असलेल्या रुग्णांचे काही नातेवाईकही जागे झाले.त्यापैकी काहींनी हा प्रकार बघितला त्यानंतर लगेच त्या चौकीदाराने संबधित रुग्णालयाच्या डॉक्टरला रात्रीलाच फोन करून माहिती दिल्याची चर्चा आहे.जर रुग्णालयामध्ये असे प्रकार होऊ लागले तर काय होईल अशी चर्चा सुरू असतानाच बेरार टाईम्सने त्या संबधित रुग्णालयाच्या डॉक्टरला भ्रमणध्वनीकरुन विचारणा केली असता त्यांनी असला कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगत रिसेप्श्नीस्टचा भाऊ त्या वॉर्डात भरती होता त्यास तो बघायला गेला होता असे सांगून असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले.संबधित मुलीची बदनामी होऊ नये याकरिता त्या रुग्णालयाचे नाव घालू इच्छित नाही.पण असे प्रकार होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुध्दा त्या रुग्णालयाच्या प्रमुखांची बाळगली पाहिजे.