स्मार्ट खेड्याकडे खास ग्राम पाथरीची वाटचाल

0
15

खेमेंद्र कटरे
गोंदिया, दि.२४- केंद्र शासनातून खासग्रामची घोषणा झाली. प्रधानमंत्र्यांनी खासदारांवर जबाबदारी टाकली. आणि क्षणात गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचे नशीब उघडले गेले.राष्ट्रवादी काँगेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांचे आवाहन स्वीकारून पाथरी गावाची निवड केली. भार्इंजींनी दाखविलेल्या प्रेमाची कल्पना पाथरीवासींयांना आली. भाईजीच्या मनात आदर्श आणि खास ग्रामचा मास्टर प्लॅन तयार झाला. भाईजींचे सर्व डावे-उजवे कामाला लागले. गावकèयांनी आपल्या स्वप्नपूर्तीची मुहूर्तमेढ आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवशी गेल्यावर्षी रोवली.आज गाव दत्तक घेऊन वर्षभराचा काळ लोटला.या एका वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयापेक्षाही अधिकचा निधी गावविकासावर खर्च करून गावाचा पूर्ण चेहरामोहराच अल्पावधीत बदलवून स्मार्ट खेड्यामध्ये या गावाला उभे करण्याचे यशस्वी प्रयत्न होतांना दिसून येत आहेत.खा.पटेलांच्या निर्देशावर आमदार राजेंद्र जैन यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले आहे.तसेही एका वर्षात qकवा तीन वर्षाच्या कार्यकाळातही एक खासदार पूर्णत त्या गावाला विकसीत करू शकत नाही,तरीही अल्पावधीतच या गावात करण्यात आलेल्या कार्यामुळे हे गाव गोरेगाव तालुुक्यासाठी एक आदर्श स्मार्ट खेडे म्हणून ओळखले जाणार आहे.विशेष म्हणजे गावात राहून प्रत्येक कामावर बारीक नजर पंचायत समिती सदस्य केवल बघेले ठेवून आहेत.गावातील विकास कामाची प्रशंसा मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाèयांनीही भेट देऊन केली आहे.एक दोन उणिवा तर प्रत्येक कामात राहणारच त्या वगळता गावातील कामाची गुणवत्ता आणि मेहनतीने गावाला नवी दिशा मिळाली असली तरी आजही या गावातील महाविद्यालयीन युवक हे गावाबाहेर शौचालयाला जातात ही बाजू या गावाच्या आदर्शपणाला मात्र कुठे तरी खटकणारी ठरते.
पाथरी व भुताईटोला येथे मनरेगामधून विविध कामे करण्यात आली,त्यातच यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतही या गावाची निवड झाली आहे.सोबतच गावातील प्रत्येक बीपीएल कुटुंबाला मग तो दलित असो आदिवासी की ओबीसी असो त्या सर्वाला घरकुल उपलब्ध करून देण्यात हे गाव यशस्वी राहिले आहे.सध्याच्या घडीला २०० च्यासंख्येत घरकुलाचे बांधकाम वेगाने सुरू असल्याचे चित्र फेरफटका मारल्यावर बघावयास मिळते.त्यातच गावातील मुख्य चौकापैकी आतमधील मुख्यचौकाचे सौदर्यीकरणासोबतच परिसरातील भाग सिमेंटीकरण करून पक्का करण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या समोरच लावलेला छोटाशा बगीचा आर्कषणाचा केंद्र तर जिल्हा परिषदेच्या शाळेला अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून संगणक देऊन शाळेला डिजिटल करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
रंगमंच, डावी-कडवी विचारसरणीमधून नाल्या, डांबरी व सिमेंट-क्राँकिट रस्ते, जलशुद्धीकरण सयंत्रणाचे कार्य साकारणार आहे. अदानी फाउंडेशनच्या सहकार्यातून गावाच्या चौकाचौकात आकर्षक टेबल-खुच्र्या आणि शाळेत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात आली आहे.अदानी फाउंडेशनने आजपर्यंत ५० सिमेंट खुर्चा,१ हातपंप,७ संगणक उपलब्ध करून दिले आहे.सोबतच वेळोवेळी आरोग्य शिबिर घेऊन १८० जणांना निशुःल्क चष्मे उपलब्ध करून दिले.सोबतच गावातच दुग्धव्यवसायाला चालना मिळावी आणि गायीचे रक्षण व्हावे यासाठी देवलापार येथे येथील काही महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतल्यानंतर जिल्हास्तरावरील बहुतांश सर्वच विभागाने गावातील योजनाकडे लक्ष दिले आहे.काही विभाग वगळता खर्वांनीच गावाच्या विकासात सहभाग नोंदविला असून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी व्यायामशाळेसाठी ७ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून येत्या काही दिवसात त्या व्यायामशाळेच्या बांधकामालाही सुरवात होणार आहे.
जि.प. उच्च प्राथमिक शाळेला आवार भिंत व स्वच्छ सुलभ शौचालय, बसस्थानक येथे शौचालय बांधकाम, भुताईटोला येथे हनुमान चौकात शौचालय बांधकाम, स्मशान घाटावर बर्निंग शेड, सभामंडप, पानघाट, भुताईटोला बोडी खोलीकरण, पाथरी बांधतलावाचे खोलीकरण, पाथरी गावतलावाचे खोलीकरण व धोबीघाट बांधकाम, जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे कम्प्युटर ई लर्निंग सेवा, पाथरी येथील २८ पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे तोडींचे बांधकाम, भुताईटोला येथे १८ विधंन विहिरीचे गटारे व खड्डे बांधकाम, हिरामन बडगाये ते कुवरलाल भोयर यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, स्व. उपचंद पटले ते परसराम परतेती यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता बांधकाम, बबु कुरैशी ते गफारभाई शेख यांच्या शेतापर्यंत पांदणरस्ता बांधकामे ही प्राथमिक नियोजनातील कामे असून यातील ९० टक्के कामे एक वर्षाच्या आतच या खासदार दत्तक ग्राममध्ये पूर्ण झाली आहेत.या योजनेतर्गत गावामध्ये ४००० झाडे सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने लावण्यात आली आहेत.वनविभागाच्या गट न ४४६ जागेवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.समाजकल्याण विभागाच्यावतीने ९.५४ लाखाचे जुनी वस्तीमध्ये नालीबांधकाम,९.५८ लाखाचा सिमेंट रस्ता बौध्दनगर मध्ये,६ लाखाचा रस्ता आंबेडकरनगरमध्ये,जिल्हाकृषी विभागाच्यावतीने १०० स्ट्रीटलाईट लावण्यासाठी १० टक्के लोकवर्गणी सुध्दा जमा करण्यात आली आहे.जिल्हा परिषद पंचायत विभागाच्यावतीने अल्पसंख्याक निधीतंर्गत १० लाखाचे समाजभवन आणि १ लाखाचे प्रवेशद्वार मंजूर झाले आहे.तांडावस्ती योजनेंतर्गत ३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून वनविभागाकडे मोहफुल संकलन गोदाम तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.खासदार पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून ६ लाखाचे रंगमंच त्यासोबतच केंद्रीय अतिविशेष निधीतंर्गत ८६ लाखाची कामे या गावात करण्यात आली यामध्ये पाथरी व भूताईटोला येथे दहनभूमी,शोकसभा मंच,धोबीघाट आदी कामांचा समावेश आहे.तर आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या निधीतून शाळेकरिता आवारqभत व शौचालय ,१८ हातपंपाकरिता ओटे बांधकाम,२७ विहिरींचे ओटेबांधकाम आणि ३ सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी ३७ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या मोठ्या निधीतून पाथरी हे स्माट खेड्याकडे वाटचाल करू लागले आहे.
परंतु वनविभाग,जलसंधारण विभाग,महिला बालविकास विभाग,देवरी येथील आदिवासी विभाग यांच्याकडे असलेली विविध कामांचे प्रस्ताव मात्र मंजूर करण्यास आजही विभागाकडून प्रयत्न करण्यात न आल्याने सर्वात महत्त्वाची उपसाqसचन योजना या गावाची रखडली गेली आहे.त्यामुळे या गावचे शेतकरी qसचनापासून वंचित राहिले आहेत.