धुंदाटोला येथे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गंत मार्गदर्शन

0
31

गोरेगाव,दि.08ः- तालुक्यातील धुंदाटोला मोहगाव बु. येथे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची सभा/ चर्चासत्र घेण्यात आले.सदर कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी गोरेगाव सौ.पाटोळे,मंडळ कृषी अधिकारी कारंजेकर,कृषी पर्यवेक्षक गजभिये,गोरेगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष कमलेश रहांगडाले, प्रगतिशील शेतकरी मनीराम पटले ,कृषी सहाय्यक देवेंद्र पारधी व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.सदर कार्यक्रमांमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना तसेच पिकावरील किड व रोग याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.तसेच रब्बी हंगाम पिक नियोजन, पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना, पीएम किसान केवायसी व केसीसी,जनावरांच्या लंपी स्किन डिसीज इत्यादी विषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहाय्यक देवेंद्र पारधी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गजानन पटले यांनी मानले.