नगरपरिषदेच्या दुर्लक्षपणामुळे वारंवार राजगुरू वार्डातील नागरिकांच्या घरात नालीचे पाणी

0
19
भंडारा -:  पावसाच्या पाण्यामुळे नाल्या तुडुंब भरल्याने राजगुरू वार्डातील सिद्धार्थ बुद्ध विहारा समोरील अनेक नागरिकांच्या घरात नाल्यांचा घाण पाणी घुसल्याने तारांबळ उडाली व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. सध्या नगर परिषदेचे पाणीपुरवठा नळ योजनेचे पाईपलाईन घालण्याचे काम अत्यंत मंद गतीने व वारंवार कामाची मुदत वाढ करून सुरू आहे.
22 सप्टेंबर ला येथील भीम चौकातील नाली वरील फुलाच्या खाली घातलेल्या पाईप मधून पाणी न जाता पाणी नाली वरून वाहू लागले व रस्त्या वरून लोकांच्या घरात घुसू लागले. तत्पूर्वी मोठे पाईपलाईन सुद्धा घातले गेले त्यामुळे ही नालीचे पाणीअविरुद्ध झाले.  त्याची तक्रार दि. 28/9/2022 ला नागरिकांच्या सह्यांनी  नगरपरिषदेला देण्यात आली होती. कारण की त्याआधी सुद्धा नाल्यांचे पाणी अशाच प्रकारे रस्त्यावर आले व लोकांच्या घरात घुसले होते.
      परंतु नागरिकांच्या तक्रारीवर नगरपरिषदेचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणाम स्वरूप दिनांक 10 व 11 ऑक्टोबरला आलेल्या पावसाचे सतत दोन दिवस नालीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने आरोग्यालाच नव्हे तर जीवाला धोका निर्माण झाला आहे.
   यापूर्वी सातत्याने प्रलंबित पाणी पुरवठा नळ योजनेचे युद्ध स्तरावर काम करण्यात यावे, नाल्यांची सफाई व रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवास योजनेचे व घराच्या पट्ट्याचे काम त्वरित करावे  म्हणून भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वय काॅ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात वारंवार आंदोलन करण्यात येत आहेत. तरीसुद्धा नगर प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पणामुळे वारंवार समस्या निर्माण होत आहेत.
    सदर समस्येचे कायमस्वरूपी  समाधान तात्काळ न झाल्यास जनआंदोलनास बाध्य व्हावे लागेल असे आवाहन काॅ. हिवराज उके, विक्की फुले व नागरिकांनी केले आहे.