युवा स्वाभिमानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
6
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांसह सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि प्रशासनीक समस्यांना त्वरीत सोडविण्यात यावे, या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाNयांमार्पâत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.  रब्बी हंगामातील धानाची शासकीय आधारभूत धानखरेदी वेंâद्रांवर खरेदी करण्यात यावी, वयोमर्यादा संपण्यापूर्वी प्रकल्प ग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकाNयांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावी, मेडीकल कॉलेज सुरू करण्यात यावे, ओबीसींचे शिष्यवृत्ती, प्रâीशीप, पदोन्नतीतील आरक्षणाच्या समस्या सोडवून ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, पर्यटन क्षेत्रात स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, ऐतिहासिक पर्यटनस्थळी कलादालन उभारण्यात यावे, आवास योजनेतील निराश्रीतांना तात्काळ घरांची व्यवस्था करण्यात यावी, ओबीसी विद्याथ्र्यांसाठी जिल्ह्यात वसतीगृह स्थापन करण्यात यावे, तांदळावर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात यावे, मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करणाNया बँकांवर कारवाई करण्यात यावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ.रवि राणा, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, उपाध्यक्ष टोमेश हरिणखेडे, जगदीश रहांगडाले, कमलेश बोपचे, प्रा.सुनिल वाघमारे, धनजित बैस, वाय.पी.येडे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाNयांमार्पâत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सदर निवेदन पाठविण्यात आले.