आदर्श तेली समाजाची कोजागिरी उत्साहात

0
43

गोंदिया- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साई मंगलम् लॉन येथे बहुसंख्ये समाज बांधवांच्या उपस्थितीत आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाचे अध्यक्ष वासुदेव वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कोजागिरी कार्यक्रमाला आमदार अभिजित वंजारी तसेच मुख्य अतिथी आमदार राजूभाऊ कारेमोरे ,प्रमुख पाहुणे उमेद्र भेलावे, माधुरीताई नासरे महिला प्रमुख,आशाताई पाटील माजी नगराध्यक्ष, महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी,एल एफ गिर्हेपुंजे,भारत पाटील,वसंत निखाडे,भरत वाघमारे,मुकुंद धुर्वे,कमल हटवार माजी अध्यक्ष, भक्तराज भेलावे,लखन धावडे, संतोष भेलावे,कमल भोंगाडे,विकास कापसे,गंगाराम बावनकर,जिजाताई पिसे,अमित घावले,मुकेश पाटील,अभिनय तरारे,विजय सुपारे,मनोज साकुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात आमदार अभिजित वंजारी यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजातील होतकरू मुलांनी विविध शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यास पुढे यावे, समाजाभिमुख विविध प्रकारचे कार्य समितिच्या वतीने आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक जिवन स्तर उंचावण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, याकरिता समाजातील मोठ्या घटकांनीही सहकार्यास पुढे यावे याबाबतीत समाज बांधवांना संबोधित केले.
आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी आपल्या मार्गदर्शनातुनही समाजाने एकत्र येऊन अधिक मजबूत व्हावे , समाजातील लहान घटकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यास आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे यासंबंधाने मार्गदर्शन केले.
वासुदेव वंजारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदर्श तेली समाज सेवा समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि समाज बांधवांना एकत्र आणण्याचा हेतू असून ११ डिसेंबर२०२२ ला संताजीच्या जयंती निमित्त भव्य रॅलीत समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक क्रिष्णाजी कापसे,किशोर नागपुरे,परसराम पिसे,रमेशकुमार बावनकर, केवलचंद बिसेन,रामकृष्णा थोटे,प्रेमबापू गायधने,चुन्निजी कुंभलकर,कमल कापसे,वामनराव कावळे,गोपाळराव कापसे,सौ.अनुसयाबाई वाघमारे,सौ.पुष्पा वंजारी, सौ.एकादशी पिसे, सौ जैतुराबाई गिर्हेपुंजे , सौ मिराबाई कापसे, सौ.कौशल्याबाई आखरे,यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लोकचंदजी डोनेकर, एस पी कुंभलकर, दिनेश गायधने, मिलिंद समरित, बाळकृष्ण बालपांडे, मनोहर कापसे, सतिश वंजारी, हरिश तुळसकर, कृष्णा कापसे,कमल हटवार, कुणाल वंजारी, सचिन पाटील, टि के बावनकर, राजू भेलावे सुनिल भोंगाडे, माधव भेलावे, किशोर कापसे, कैलास भेलावे व महिला प्रतिनिधी आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदिया चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समितीचे सचिव शेषराज आकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कमल हटवार यांनी पार मानले.