आसोली पशुवैद्यकीय दवाखान्याचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
40

गोंदिया दि. 02आसोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या दवाखान्यामुळे परिसरातील दहा गावातील पशुधनाला याचा लाभ होणार आहे.

 जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, सभापती संजय टेंभरे,कृषी व पशुसंवर््धन सभापती रुपेश कुथे, पशुसंवर्धन सह आयुक्त बलदेव रामटेके, पशु संवर्धन उपयुक्त डॉ. श्रीधर बेदरकार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल व अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.60 लाख रुपये खर्च करून हा दवाखाना उभारण्यात येणार आहे. या दवाखान्याचे बांधकाम जून 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.