गोंदियात आमगाव मार्गावर कौटुंबिक न्यायालय सुरू होणार

0
11

गोंदिया :  जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचा निपटारा करण्यासाठी आता गोंदियात भाड्याच्या इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या व्यवस्थापक नलीनी भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार २000 चौरस फुटात हे न्यायालय असणार आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे मनोहर चौकातील निर्मल सिनेमा गृहाजवळ हे कौटुंबिक न्यायालय सुरू होणार आहे.

कौटुंबिक न्यायालय पोटगी मागणार्‍या अर्जदाराला हलफनामा सादर करण्यासाठी ही सांगू शकतो. पोटगी देण्यास असर्मथ असलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर रहावे लागते. अशा व्यक्तीला काही काळ वाट पहायला सांगणे किंवा अधिक वेळ झाल्यानंतर त्या व्यक्तीला मेटेनन्स देण्यात न्यायालय सांगू शकतो. कौटुंबिक न्यायालयामुळे आता लवकरच प्रकरण निकाली लागणार आहेत.
गोंदिया कौटुंबिक न्यायालय सुरू करण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. त्या साठी हे न्यायालय सुरू करण्यासाठी दोन हजार स्केअर फुटच्या इमारतीची गरज असल्यामुळे भाड्याची इमारत जिल्हा न्यायालयाने शोधली आहे.जिल्ह्यात पती-पत्नीचे वाद, पोटगी प्रकरण, घटस्फोट या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक प्रकरणे लांबणीवर जातात.
कौटुंबिक वादाचा निपटारा त्वरीत व्हावा यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयाने गोंदियात कौटुंबिक न्यायालय सुरूकरण्याचे आदेश दिले.इमारतीसाठी जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मागणी केली आहे. महिला व बाल लैगिक अत्याचाराच्या प्रकरणातही वाढ झाल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय सुरू होणार होते.परंतु काही दिवसापूर्वी जिल्हा न्यायाधीश श्रीमती आनंद यांनी गोंदियात प्रभार स्विकारल्यामुळे त्यांच्याकडे महिलांसंबधी सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी देण्यात आला आहे.