माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटरचे उदघाटन

0
24

गोंदिया।विधु ऑनलाईन सेवा केंद्र बस स्टॉप ग्राम हिवरा ता.गोंदिया येथे गरुडा एरोस्पेस प्राईवेट लिमिटेड व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती च्या वतीने ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर चे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

माजी आमदार राजेंद्र जैन यावेळी संबोधित करताना म्हणाले की, शेतकरी सक्षम व समृद्ध करण्याच्या दृष्टीने शेतीचे यांत्रिकीकरण व प्रोत्साहन देण्यासाठी शेती मधील विविध पिकां करीता ड्रोन चा वापर उपयुक्त होनार आहे. ड्रोन पायलट ट्रेंनिग सेंटर मुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना आणि सर्वसामान्यांना रोजगार मिळेल याची निश्चितच खात्री आहे. जिल्‍ह्यातील अतिदुर्गम क्षेत्रात ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर च्या विस्तारामुळे शेती सहित अन्य क्षेत्राच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, मनीषा नागलवाडे, निरज उपवंशी, प्रविण गोखे, राजेशसिंह परिहार, मायकाल मेश्राम, विनोद नंदेश्वर, दिपक ठाकरे, धणजीत बैस सहित मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.