अ.भा.दलित अधिकार आंदोलनाचे गोंदिया जिल्हा अधिवेशनात जिल्हा समितीची निवड़

0
25

गोंदिया,-अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे प्रथम जिल्हा प्रतिनिधी अधिवेशनाची सुरूवात कामगार भवन गोंदिया येथे एड.अशोक बोरकर यांचे अध्यक्षतेत सर्वप्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे तैलचित्रावर माल्यार्पण करूण करण्यात आली. तसेच कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विजयवाड़ा येथे झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय महाधिवेशनात कॉ.शिवकुमार गणवीर यांची सदस्य पदावर निवड़ झाल्याने पुष्पगुच्छ देवुण त्यांचे अभिनंदन करण्यात आले .जिल्हा संयोजक मिलिंद गनविर यांचे प्रास्ताविक भाषणा नंतर कॉम्रेड हौसलाल रहांगडाले,काॅ.रामचंद्र पाटील, काॅ.करूणा गणवीर,अशोक मेश्राम, शालुताई कुथे,यांनी विचार व्यक्त केले .प्रमुख वक्ते राज्य निमंत्रक कॉ.शिवकुमार गनवीर (भंडारा) यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत सांगीतले की एकीकड़े आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित आहोत. या अमृत कालीनह काड़ात उत्तर प्रदेशाच्या लखीमपुर(खिरी(येथे दोन दलित मुलींवर बलात्कार करूण हत्या करण्यात आली, राजस्थान मध्ये एका शालेत शिकणा-या मुलास त्यांनी स्वर्ण शिक्षकांच्या पाण्याचे माटास (घड़ा) स्पर्श केला म्हणुण शिक्षकाच्या मारहाणिस त्याची मृत्यु झाली. एका आकड़ेवारी नुसार दर दहा मिनीटांनी आपल्या देशात दलित अत्याचाराची एक घटना घड़ते ,भाजप सत्तेत आल्या नंतर भाजप शासीत राज्यात अशा घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विरोधी सरकार असलेल्या राज्यही यात मागे नाहीत.दलित आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याला कमजोर करण्यात येत आहे याशिवाय दलितांच्या सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्याचे योजना व उपायांवर कात्री लावण्यात येत आहे राज्य सरकारने दलित विकास सेवांचे खाजगीकरण करून आड़मार्गाने आरक्षण संपविल्या जात आहे. दलितांना भुमिवितरण, शिक्षण,रोजगार, निवास व आरोग्य आणि विकासाच्यां योजना एकतर बंद केल्या जात आहेत किंवा ठप्प केल्या जात आहेत. या प्रश्नांना घेवुणच वर्ण संघर्ष व वर्ग संघर्षाचे समन्वय साधुण देशपातड़ीवर प्रखर संघर्ष करणाऱ्यां एका राष्ट्रव्यापी संघटनेची अत्यंत गरज लक्षात घेवुन राष्ट्रीय स्तरावर “अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन “ह्या संघटनेची औरंगाबाद(महाराष्ट्र)येथे राष्ट्रीय अधिवेशनात झाली. याच पार्श्वभूमीवर दलित व कष्टक-यांच्या 5 संघटनाचां 5 नोव्हेंबरला दिल्लीत राष्ट्रीय कन्वेंशन झाले. यात दलीतांच्या प्रश्नांना घेवुन संयुक्त मोहिम व देशातील सर्व राज्याचे राजधानीत संयुक्त आंदोलन करण्याचे ठरले आहे. गोंदिया जिल्हा अधिवेशनात जिल्हा शाखेची निवड़ करण्यात आली असुन कार्यकारिणीत मिलिंद गनविर(अध्यक्ष),रामचंद्र पाटील (कार्याध्यक्ष),शंकर बिंझलेकर,,चरणदास भावे (ऊपाध्यक्ष),अशोक मेश्राम(,सचिव), करूणा गनविर(सहसचिव), प्रल्हाद ऊके(सहसचिव), सुरेश रंगारी(कोषाध्यक्ष)व कल्पना डोंगरे, कल्पना शहारे, अमित खोब्रागड़े, एवन मेश्राम सह 15 सदस्यांचा शमावेश आहे हे सर्व पदाधिकारी 9 डिसेंबर ला मुंबई येथे होणारे राज्य अधिवेशनात भाग घेणार आहेत.