प्रफुल्ल पटेल दोन दिवस जिल्ह्यात

0
7

गोंदिया : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल ६ व ७ मार्चला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

खा.पटेल दि.६ ला भंडारा जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने ३ वाजता सौंदय येथे सहकारी राईल मिल प्लान्टच्या आधुनिकीकरण कामाचे उद्घाटनास उपस्थित राहतील. ४.३० वाजता तिरोडा तालुक्यातील गांगला येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच दि.७ ला महाशिवरात्रीनिमित्त सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र नागरा, प्रतापगड, तसेच गायमुख येथे पुजा अर्चना करणार आहेत.

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने यावर्षीही प्रतापगड आणि गायमुख येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या महाप्रसाद कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीचे सचिव आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी खा.पटेल महाशिवरात्रीच्या पर्वावर जिल्ह्यात आवर्जुन उपस्थित राहत आहेत.