तिरोडा येथे वंदे भारत एक्सप्रेसचे आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते जंगी स्वागत

0
45

तिरोडा येथे थांबा देण्याकरिता रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करणार आ. रहांगडाले यांची माहिती
तिरोडा:- भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून नागपूर ते बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेसचे शुभारंभ नागपूर येथे पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात आले या एक्सप्रेसच्या प्रथम आगमनानिमित्त तिरोडा रेल्वे स्थानकावर आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले .या स्वागताच्यावेळी प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे,जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन,प्रवीण पटले,माधुरी रहांगडाले,तुमेश्वरी बघेले,रजनी कुंभरे, सभापती कुंता पटले,प.स.सदस्य डॉ.चेतलाल भगत,भाजयुमो शहर अध्यक्ष अमोल तितिरमारे,मजूर सहकारी संस्था जिल्हा सचिव उमाकांत हारोडे, माजी उपसभापती विजय डिंकवार,मा.न.प.सभापती अशोक असाटी, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद मडामे,पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, रेल्वे स्टेशन मास्टर पलाश बिस्वास, वाणिज्य निरीक्षक, काचेवानी बुकिंग लिपिक भवानी बैस, नितीन पाटील मीनाक्षी ठाकरे, राणी सोनेवाने,प्रकाश सोनकावडे, दिगंबर ढोक,संजय बैस,शीतल तिवडे, अमित पारधी, चेतन परमार,विजयकाका ग्यानचंदानी,वसीम शेख,अखिल पटले, गौरव चौरसिया,शुभम बघेले,अखिल पटले,प्रमोद गौतम, अनुप बोपचे, नितीन पारधी,मेघा बिसेन,श्वेता मानकर, ,गौरव निनावे, वासू कनोजे,विजय कटरे ,नरेंद्र कटरे सुशील राहगडाले, रोशन शहारे, दिनेश चोभरे, चेतन पारासर, सुरेश ज्ञानचंदानी, संजीव केशरवाणी, शहीद मिश्र विद्यालयातील NCC चे विद्यार्थी,NCC ऑफिसर मेजर सुनील शेंडे तसेच तिरोडा तालूक्यातील सर्व पत्रकार महोदय हजर होते.