पूर्णा पटेल यांचा आशावाद : ‘पाथरी‘ गाव होणार स्वयंपूर्ण

0
9

गोरेगाव.दि.७ : शासनाच्या विविध योजना तसेच विविध कंपन्यांकडून येणारा निधी यातून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदर्श गाव योजनेंतर्गत निवडलेले पाथरी हे गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. प्रफुल्ल पटेल हे ठरविलेले कार्य पूर्ण करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यासाठी सर्वांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन पूर्णा पटेल यांनी केले. पाथरी येथे भेट दिल्यानंतर नागरिकांशी त्या संवाद साधत होत्या. पूर्णा पटेल व आमदार राजेंद्र जैन यांनी पाथरी गावाचा फेरफटका मारून विकासकामांचा आढावा घेतला.

या वेळी आमदार राजेंद्र जैन गावकèयांशी संवाद साधताना म्हणाले,खा.पटेल यांनी आदर्श गाव योजनेसाठी पाथरी या गावाची निवड करण्यासाठी सर्वसमावेशक विचार केला. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाèया शहीद जाम्या तिम्याची कर्मभूमी या गावाजवळ आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे. गावात चांगल्या दर्जाची कामे केली जातील. तत्पूर्वी शाळा व्यवस्थापन समिती, सेवा सहकारी समिती, पाणलोट समिती, तंटामुक्त गाव समिती, सुरक्षा समिती, दारूबंदी समिती, बचत गट आदींच्या सहकार्यातून गावातून qदडी काढण्यात आली. अदानीफाऊंडेशनच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावात वृक्षारोपण करण्यात आले. पूर्णा पटेल व आमदार राजेंद्र जैन यांनी गावातील तलावाला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. बौद्धविहाराला भेट देऊन समाजबांधवांशी चर्चा केली.
महिलांना सक्षम करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे पूर्णा पटेल यांनी गावातील महिलांशी संवाद साधताना सांगितले. पूर्णा पटेल व आमदार राजेंद्र जैन यांच्या आगमनावर ग्रामपंचायत व गावकèयांनी स्वागत केले. शेतकèयांचा आर्थिक विकास साधण्यासाठी प्रलंबित उपसा qसचन प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावून शेतकèयांना दुबार पेरणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार जैन यांनी सांगितले. अदानी समूह पाथरी गावासाठी सहकार्य करीतच आहे, पुन्हा गरज पडल्यास आपण इतर समूहाकडून निधी उपलब्ध करू असे सांगत पाथरीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या वेळी देवेंद्रनाथ चौबे, तालुकाध्यक्ष केवल बघेले,जि.प.सदस्य ललिता चौरागडे, निखिल जैन, केतन तुरकर, अदानी समूहाचे सी.पी. शाहू, एस.के. मित्रा, सुबोधqसग, ममता जनबंथू, संजय कटरे, सुरेश तिरेले, कटरे, अनिता तुरकर,सुमन भुरकुडे, गफ्फारभाई, कुवरलाल भोयर, डिलेश्वरी तिरेले, तिलक गधवार, किरण बिसेन, प्रकाश कटरे उपस्थित होते.