दुचाकी पुलाला आदळली, चालकाचा मृत्यू

0
12

सडक अर्जुनी, दि.७ : भरधाव दुचाकी पुलाला आदळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सितेपार- मुंडीपार गावाच्या मधोमध असलेल्या पुलावर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. लोकेश बाबूलाल टेकाम (वय २३, रा. पुजारीटोला ता. साकोली, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे.
एमएच ३५- डब्ल्यू. १६७५ क्रमांकाच्या दुचाकीने लोकेश टेकाम हा पांढरीवरून पुजारीटोलाकडे जात होता. या दरम्यान मुरदोली- कोसमतोंडी मार्गावरील सितेपार – मुंडीपारच्या मधात असलेल्या पुलाला दुचाकी आदळली. या अपघातात लोकेशच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.