लाखो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन …..खासदारांनी वाटले महाप्रसाद

0
22

गोंदिया,दि. ७ : महादेवा जातो गा ऽऽऽ देवा माझ्या…
नदीले टोंगरा टोंगरा पाणी…
नंदी लागले पोहणी…
गडावरी गड रे ‘हादेवा…
गड चवèयाचा भारी गा…
अन् उतरत्या पायरीने…
आली डोळ्याले अंधारी…
हरबोला हर हर महादेव ऽऽऽ
असा गजर करीत लाखो भाविकांनी सोमवारी (ता. ७) भोलेनाथाचे दर्शन घेतले. निमित्त होते महाशिवरात्रीचे.
जिल्ह्यातील मध्यकाशी कामठा, नागराधाम, टेमनी, फत्तेपूर, ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व प्राप्त असलेले प्रतापगड, पोगेंझरा (बोडुंदा), अर्धनारेश्वरालय यासह भोलेनाथाचे मंदिर असलेल्या स्थळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी नवस फेडून आपल्या मनोकामना पूर्ण केल्या.
गोंदिया : शिवमंदिर मध्यकाशी कामठा येथे हजारो भाविकांनी एकत्र येत महादेवाचे दर्शन घेतले. सकाळी ६ वाजता महाशिवाभिषेक व ११ वाजता महामृत्यूंजय यज्ञ करण्यात आला. श्री ज्ञानगंगेश्वर शिव मंदिर समिती टेमनी व चुलोदच्या वतीने ६ ते ८ मार्चपर्यंत टेमनी येथे महाशिवरात्री मेळावा आयोजित केला आहे. सोमवारी पहाटे चार वाजता भगवान शिव यांचा अभिषेक झाला. त्यानंतर विविध कार्यक्रम घेण्यात आले. भाविकांची सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.
आसोली : गोंदिया तालुक्यातील नागरा येथे भोलेनाथाच्या दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. प्राचीन आणि जागृत देवस्थान समजले जाणाèया नागरा येथील मंदिर प्रशासनाने भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता नियोजन केले. दर्शनासाठी येणाèया भाविकांकरिता महाप्रसाद, पाण्यासह इतरही सोयी- सुविधा करण्यात आल्या होत्या.खासदार प्रफुल पटेल व त्यांची पत्नी वर्षा पटेल यांनी सकाळीच नागरा येथे जाऊन पुजार्चना केली.
गोंदिया : येथील प्राचीन कालादेव शिव मदिरात सोमवारी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विदर्भ प्रदेश विकास परिषद व गौरक्षा सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सकाळी ५ वाजता महाभिषेक व महामृत्यूंजय जप झाला. सकाळी ९ वाजता शिव चालिसा पाठ, दुपारी १ वाजता हवन पूजन, सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले.
गोरेगाव : प्राचीन तिर्थस्थळ पोंगेझरा (बोडुंदा), हिरडामाली, मांडोदेवी देवस्थान तेढा, नोनीटोला, गिधाडी, धुंदाटोला येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरली. या स्थळी परिसरातीलच नव्हे तर, दूरवरून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. स्थानिक ग्रामपंचायत, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनानेही भाविकांच्या सुविधेसाठी उपाययोजना केल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
अर्जुनी मोरगाव : ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व प्राप्त असलेल्या प्रतापगड येथे लाखो भाविकांनी हजेरी लावली.महादेवा जातो गा ऽऽऽ चा गजर करीत आलेल्या भाविकांनी भोलेनाथाचे दर्शन घेत मनोकामना पूर्ण केल्या. असंख्य भाविकांनी नवस फेडले. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून स्थानिक ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासन सज्ज होते. खासदार प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री राजकुमार बडोले व मित्र परिवार तसेच खासदार नाना पटोले यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.खा.पटेल यांच्या वर्षा पटेल,पुर्णा पटेल,आमदार राजेंद्र जैन,किशोर तरोणे,मनोहर चqद्रकापुरे,उध्दव मेहंदळे,तर खासदार नाना पटोले यांच्या महाप्रसादस्थळी रचना गहाणे,कविता रंगारी,दयाराम कापगते,राजू पालिवाल,अशोक चांडक,उमाकांत ढेंगे,प्रकाश गहाणे,निलम हलमारे,विनोद पटोले आदी उपस्थित होते. दर्शनाकरिता आलेल्या भाविकांसाठी पाणीपुरठा मंडळाकडून पाणी वेळोवेळी पुरविण्यात आले. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर हजारो भाविकांनी दग्र्यावर चादरदेखील चढविली. प्रतापगडात असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंदही भाविकांनी लुटला. भाविकांच्या सुरक्षेत कोणतीही कमी पडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला
सालेकसा : हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम, अर्धनारेश्वरालय तसेच पोंगेझरा, तिरखेडी येथे महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरली. हजारो भाविकांनी या स्थळी मोठी गर्दी करीत महादेवाचे दर्शन घेतले. तेथील पर्यटनाचा आनंददेखील लुटला.याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबिराला खासदार अशोक नेते यांनी भेट दिली.