युवतीची छेडखानी करणाऱ्या गुरनानींना अटक करा-अहिरकर

0
8

विनोद अहिरकर यांची मागणी : आंदोलनाचा इशारा
गोंदिया, दि. १३ : युवतीची छेडखानी करणारा आरोपी हिरानंद गुरनानी  अद्यापही मोकाट आहे. या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद अहिरकर यांनी दिला आहे. येथील शासकीय विश्रा‘गृहात रविवारी (ता. १३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साई कॉम्प्लेक्समधील आयबीटीई इन्स्टियूट समोरच्या वऱ्हांड्यात  फ्रिजर ठेवण्यात आले आहे. या फ्रिजरमधील पाणी पिण्याकरिता गेलेल्या युवतीची २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनला हिरानंद गुरनानी याने छेड काढली. या प्रकरणातील आरोपी गुरनानी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, घटनेला पंधरवाडा लोटला तरी, आरोपीवर कारवाई झाली नाही. रामनगर पोलिस गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत. गुरनानी याने सचिन शेंडे यांच्याविरोधात सुडभावनेतून तक्रार केली आहे. निर्दोष असलेल्या सचिन शेंडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि खऱ्या आरोपीला मोकाट सोडले आहे, असा आरोपही विनोद अहिरकर यांनी केला. दरम्यान, एकाच पोलिस अधिकाऱ्यांमाफर्त या प्रकरणाची चौकशी करावी, दोषी गुरनानी यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी अहिरकर यांनी केली आहे. हा मुद्दा आपण उच्च न्यायालयापर्यंत नेणार असून राज्याच्या सुरु असेलेल्या अधिवेशनात सुध्दा उपस्थित करण्यासाठी आमदारांना माहिती देणार असल्याचे सांगितले. रामनगर पोलिसांनी योग्य तपास करुन कारवाई केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर कलार समाजबांधवाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.