अखेर ‘विवेक‘चा मृतदेह निघाला

0
12

गोंदिया, दि.14: सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथील चांदेवार यांच्या शेतातील उघड्या बोअरवेल‘ध्ये पडलेल्या विवेक खुशाल दोनोडे (वय ४) याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काम थांबविण्यात आले होते.मात्र रविवारच्या रात्रीला पुन्हा एअर प्रेशर देऊन बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.त्या प्रयत्नामध्ये एनडीआरएफसह मिल्ट्रीला यश आले आणि एय़र प्रेशरच्या दबावात पाण्यात झालेल्या हालचालीने विवेकचा मृतदेह छत्रीमद्ये अडकला गेला.छत्रीत मृतदेह अडकल्याचे समजताच हळूहळू ती रस्सी बाहेर ओढण्यात आली असता गेल्या पाच दिवसापासून ज्या विवेकला काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते,त्या विवेकचा मृतदेह बाहेर निघाला. मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यावेळी सैन्यासह एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी,अग्निशमन विभागाचे प्रमुख आणि जिल्हा प्रशानाचे काही वरिष्ठ उपस्थित होते.विवेकच्या कुटुंबावर या घटनेने दुुखाचे डोंगर कोसळले असून मृतदेह निघाल्यापासूनच राका पळसगाव या गावात स्मशानशांतता पसरली होती.

याप्रकरणात आजीसोबत शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तीन वर्षाच्या विक्की दोनोडे याचा बोअरवेलच्या खड्डय़ात पडून मृत्यू झाल्यासंदर्भात रामकृष्ण श्रावण चांदेवार (६0) व देवराम श्रावण चांदेवार (५५) हे दोन शेतकरी व बोअरवेल खोदणारा चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राका (पळसगाव) येथील विक्की ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बोअरवेलच्या खड्डय़ात पडला. डुग्गीपार पोलिसांनी भादंवि कलम ३३६, ३0४ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.तपास डुग्गीपार पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.