प्रबोधन समाजाला सुसंकृत करण्याचे एक माध्यम – माजी आमदार राजेंद्र जैन

0
15

गोंदिया,दि.16ः अनेक वर्षांपासून चालत आलेला सामाजिक अनिष्ठ रुढींचा प्रवाह रोखून व मुलींच्या शिक्षणाची दरवाजे खुले करून समाजामध्ये परिवर्तनाची प्रचंड इच्छाशक्ती व ताकद क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केली. यांच्या महान कार्याला कोटि कोटि नमन करून यांच्या विचारांना एका पिढी पासून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहचविण्याचे कार्य आपण सर्वांनी प्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

ग्राम टेमनी ता. गोंदिया येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीचे अनावरण सोहळा निमित्त प्रबोधन गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजेन्द्र जैन पुढे म्हणाले की आजच्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचे वाचन व प्रबोधन या माध्यमातून महापुरुषांचे आदर्श व विचारांना आत्मसात करून समाजाला सुसंकृत करण्याची नितांत गरज आहे.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ पूजाताई अखिलेश सेठ, सरपंच योगेश पटले, उपसरपंच शैलेश डोंगरे, माजी सरपंच शिवलाल नेवारे, माजी सरपंच विनोद मेश्राम, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था नरेश तिवारी, उपाध्यक्ष सेवा सह चंद्रकिशोर नांदणे, तंटामुक्ती अध्यक्ष छगनलाल नेवारे, जीवनप्रसाद दमाहे, हिरासिंग दमाहे, गोवर्धन सराटे, संदीप बानेवार, उमासिंग उईके, देवानंद खोब्रागडे, राजू टेकाम, माणिक पटले, वेंकट किरणापुरे, शरद लांजेवार, कीर्ती भेलावे, मालतीताई ठाकरे, सुषमाताई पटले, मालतीताई पटले, किरणापुरे ताई, राजेश आंबेडारे, शेखर किरणापुरे, निशा तिवारी, भरत बानेवार, सुनील पटले, रौनक ठाकूर, देवराम गायधने, सखाराम बनकर, लोकेश किरणापुरे, योगेश गायधने व सर्व माळी मरार समाज संघटना चे पदाधिकारी व समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते.