भटक्या विमुक्त जमातीच्या आश्रमशाळा सिनियर कॉलेज पर्यंत सुरू करा- दादासाहेब इदाते

0
13

गडचिरोली: स्व. वसंतराव नाईक प्राथमिक विमुक्त जाती व जमाती आश्रम शाळा आनंतपुर/रेखेगावं येथे दादासाहेब इदाते यांची सदिच्छा भेट दिली त्या वेळी इदाते साहेब यांचे भव्य स्वागत ड्रम पताका ने करण्यात आले दादासाहेब यांनी आश्रमशाळा ची वेवस्था बघितली, विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या. आश्रम शाळा महाराष्ट्र राज्याच्या इदाते समिती च्या रोपोर्ट नंतर सुरू झाल्या त्या आता प्राथमिक, उच्च, ज्युनियर कॉलेज पर्यंत आहे, आणि यापुढे सिनियर कॉलेज ही येथेच व्हावे, एवढेच नव्हे तर नवोदय किंवा आदिवासी साठी असणाऱ्या एकलव्य सुविधा ही या आश्रमशाळेसाठी मिळाव्या म्हणजे भटक्या विमुक्त विध्यार्थीचे शिक्षणाचे प्रश्न सुटतील असे मत व्यक्त केले.

मुकुंद अडेवार म्हणाले की राज्य आणि केंद्रसरकार च्या शिक्षणाच्या सर्व योजना शिक्षक व गावकरी यांना मिळाव्या यासाठी प्रशिक्षण शिबीर शिक्षक संघटना व गावकरी व शासन यांच्या संयुक्त माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे आहे , महाज्योती च्या योजना शिक्षणा साठी उत्तम आहे, केंद्र सरकार ची सिड योजना महाराष्ट्र राज्याच्या सर्व योजना एकाचवेळी कागदापत्रासह मिळावे यासाठी महाशिबीर घेणे गजेचे आहे असे मत मांडले.

किशोर सायगण यांनी जेवढ्या भटक्या विमुक्त जमातीच्या आश्रमशाळा आहे तेथे प्रत्येक समाजातील विद्यार्थी यांनी प्रवेश घ्यावा, पोटापाण्यासाठी भटकंती करणाऱ्या लोकांनी स्वतः रोजगारासाठी जावे मात्र मुलं-मुलींना आश्रमशाळा मध्ये दाखल करून मुलाचे शिक्षण करावे असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवर्धनजी चव्हाण यांनी लवकरचं सर्व आश्रम शाळेच्या शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मिटींग घेण्याचे आश्वासन दिले. ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज याचं परिसरात झाल्यास या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. दादासाहेब इदाते यांनी मांडलेल्या या प्रश्नाल आम्ही पुढे नेऊ दादासाहेब यांनी अशी मिटींग  मुख्यमंत्री व अतुल सावे मंत्री यांची लावावी म्हणजे काही प्रश्न सुटतील असे ते म्हणाले.या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक , शाळेतील मुख्याध्यापक श्री ढोके व चव्हाण  मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेश नाकड़े सर तर आभार प्रा. वावरे सर यांनी मांडले.