‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२’ या राज्यस्तरीय स्पर्धेत गोंदियाच्या स्नेहाला प्रथम क्रमांक

0
18

गोंदिया:- मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २६ सप्टेंबर  ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहिर करण्यात आले. या स्पर्धेत गोंदिया शहर नजीकच्या ढाकनी निवासी व सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या स्नेहा प्रदीप मेश्राम हिने प्रथम क्रमांक पटकावला. निवडणूक आयोग कार्यालयातर्फ़े राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील पाटकर सभागृह, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ चर्चगेट येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्याना पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून कुलगुरु प्रा.डॉ. उज्ज्वला चक्रदेव, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक असणारे कलावंत सान्वी जेठवानी यांच्या हस्ते स्नेहाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी स्नेहाची आई मोहिनी मेश्राम उपस्थित होत्या. आयोजित सदर स्पर्धेचा विषय लोकशाही, मताधिकार या विषयावर आधारित लोकगीते हा होता. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक यवतमाळची प्रिया माकोड़े हिने तर तृतीय क्रमांक सोलापुरच्या बाळू बनसोडे यानी पटकावले. सदर स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पुंडलिक कोल्हटकर आणि डॉ. सान्वी जेठवाणी यांनी पाहिले. 
सतत पाठबळ व मार्गदर्शन करणारे गुरु प्रा.डॉ.दिशा गेडाम (एसएस गर्ल्स कॉलेज गोंदिया), राधेश्याम चौधरी (उत्तम तबला वादक व शिक्षक , जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्रा), प्रतीक राऊत (एम.ए.अध्य. मराठी, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ), अतुल सतदेवे (संयोजक, संविधान मैत्री संघ), आई मोहिनी मेश्राम व वडील प्रदीप मेश्राम यांचे स्नेहाने आभार व्यक्त केले. ग्राम ढाकनी व जिल्ह्यातून विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने यशवंत स्नेहाचे अभिनंदन करण्यात आले.