क्षत्रिय राजाभोज जयंती समारोह संपन्न

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव- तालुक्यातील गणखैरा टोला येथे दरवर्षीप्रमाणे ७ व्या वर्षी छत्रिय राजाभोज जयंती समारोह भाजप नेते रेखलाल टेंभरे यांच्या अध्यक्षतेत पार पाडण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित रमेश ठाकूर (जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख भाजपा),अर्चनाताई ठाकूर (सरपंच सटवा), रहांगडाले जी (उपसरपंच पुरगांव), लिखन पारधी (उपसरपंच गणखैरा), खून्निलाल पारधी (माजी सरपंच गणखैरा), केवल बघेले (माजी पं.स.सदस्य), ओंकार कटरे (पाथरी) व आदी मान्यवर उपस्थित होते.चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी त्यांच्या पराक्रमाने राज्य निर्माण केले. समाज बांधवांनी राजाभोज यांचे आदर्स अंगीकारून समाजपयोगी कार्य करावे असे आव्हान भाजपा नेते रेखलाल टेंभरे यांनी केले. मागील सात वर्षापासून गणखैरा टोला येथे समाज बांधवांच्या वतीन राजाभोज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजाभोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. यानंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.