माजी पालकमंत्री फुके यांच्या आग्रहची पूर्तता, शिंदे-फडणवीस सरकारने धान खरेदीची मुदत 15 दिवसांनी वाढवली

0
13

भंडारा/गोंदिया.(03 फेब्रुवरी)
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसह इतर धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये, 2022-23 च्या पणन हंगामासाठी धान खरेदीचे संपूर्ण उद्दिष्ट 31 जानेवारी 2023 पर्यंत शासकीय आधारभूत किंमतीवर पूर्ण नाही झाल्यावर धान उत्पादक शेतकरी धानाच्या विक्रीबाबत चिंतेत होते.

या गंभीर प्रकरणाबाबत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी, क्षेत्राचे माजी आमदार व माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या सी भेंट करुन माहिती दिली होती. माहिती द्वारे शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत दराने धान खरेदीची मुदतवाढ वाढ़वण्यासाठी आग्रह केला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे माजी पालकमंत्री श्री फुकेनी, शिंदे-फडणवीस सरकारकडे धान खरेदीची मुदत वाढवून देण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.

धान खरीदी च्या मुद्द्यावर, फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धान खरेदीचा मुद्दा उपस्थित केला, त्याअंतर्गत शेतकरी हितचिंतक सरकारने अन्न पुरवठा विभागाला मुदतवाढ देऊन शासकीय आधारभूत दराने धान खरेदी करण्याचा शासन निर्णय जारी करण्याचे आदेश दिले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३ फेब्रुवारी रोजी शासन आदेश जारी करून शासकीय धान खरेदीची तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवून दोन्ही शासकीय धान खरेदी संस्था, जिल्हा पणन संघ व आदिवासी विकास महामंडळ यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले.

धान खरेदीसाठी पंधरा दिवसांच्या मुदतवाढ वाढवून दिल्याने दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन व माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे आभार व्यक्त केले.