मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनात कृषि विभागाचे स्टॉल आकर्षणाचे केंद्र

0
10

गोंदिया,दि.14 : माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्या वतीने नुकतेच प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ‘‘मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन’’ कार्यक्रमात कृषि विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते.

         सदर स्टॉलमध्ये पोषक तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, राजगिरा व नागली यांची ओळख व पोषण आहारात महत्व याबाबतची माहिती स्टॉलवर देण्यात आली होती. सोबतच जिवंत नमुने म्हणून ज्वारीचे कनीस व तृणधान्याचे पदार्थ राजगिरा लाडू, ज्वारीची आंबील व स्टॉबेरी ठेवण्यात आली होती.

         सदर स्टॉलला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या सहायक संचालक निकीता जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी भेट दिली. सदर भेटीत ज्वारीच्या आंबीलीची चव चाखूण स्टॉलची स्तुती केली.

         सदर प्रदर्शनात पौष्टीक तृणधान्य, सेल्फी पॉईंट हे प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.